DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
10:02 PM | Thu, 26 May 2016

Download Our Mobile App

Download Font

अॅसिड हल्ला – कंगणाच्या बहिणीच्या व्यथा

78 Days ago
| by Prahaar

Kangana-Ranaut-Birthday-Bash-Rangoli-090316

अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या बहिणीसोबत बॉलीवूडमधील अभिनेत्री कंगणा राणावत फॅमिना या इंग्रजी मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणार आहे.

नवी दिल्ली - अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या बहिणीसोबत बॉलीवूडमधील अभिनेत्री कंगणा राणावत फॅमिना या इंग्रजी मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणार आहे. तिच्या बहिणीच्या जीवनातील काळीज पिळवटून टाकणा-या घटना यानिमित्ताने समोर आल्या आहेत.

रंगोली हिने एका कार्यक्रमात सांगितले की, माझ्यावर अॅसीड अटॅक झाला होता. यामुळे माझा एक डोळा ९० टक्के निकामी आहे. तसेच माझा एक स्तन खराब झाला आहे.

मी रुग्णालयात भरती होते, त्यावेळी मला रोज वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसाठी ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जात होते. प्लास्टिक सर्जरी इतकी सोपी नसते, असे तिचे म्हणणे आहे

पुढे ती अशी म्हणते की, माझ्या जळालेल्या चेह-यावर ५८ वेळा शस्त्रक्रिया केली गेली. मी २३ वर्षांची असताना मला हा मानसिक आणि शारिरीक त्रास सहन करावा लागला. त्यावेळी माझ्या आई वडिलांसह माझी बहिण कंगणा हिने माझी खुप काळजी घेतली होती.

रंगोली असेही म्हणाली की, अॅसीड अटॅक नंतर पीडित व्यक्तीचा त्वरीत इलाज केला गेला नाही तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर होतो. कंगणा त्यावेळी बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष करत असतानाही माझी बहिण माझ्या पाठीशी उभी राहिल्यामुळेच मी या प्रसंगातून बचावले.
()

Viewed 103 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1