DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
04:31 AM | Fri, 01 Jul 2016

Download Our Mobile App

Download Font

आफ्रिदीचे भारतप्रेम- मियांदाद भडकला

108 Days ago
| by Prahaar

javed-miandad-140316

पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या ‘भारतप्रेमा’ने माजी कर्णधार जावेद मियांदाद भडकला असून आम्हाला तुझी लाज वाटते, असे त्याने म्हटले आहे.

कराची- पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या ‘भारतप्रेमा’ने माजी कर्णधार जावेद मियांदाद भडकला आहे. आफ्रिदी आम्हाला तुझी लाज वाटते, असे त्याने ‘आज टीव्ही’ला सोमवारी सांगितले.

‘‘आफ्रिदीने अशाप्रकारचे विधान करताना आफ्रिदीने थोडा फार विचार करायला हवा होता. त्याच्या ‘भारतप्रेमी’ वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,’’असे मियांदादने म्हटले. टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळायला मिळाले म्हणून क्रिकेटपटूंनी यजमान देश आणि बोर्डाची इतकी तारीफ आवश्यकता नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ‘‘भारताने आम्हाला काय दिले? भारतात असताना सत्य बोलण्याची हिंमत दाखवली पाहिजे.

गेल्या पाच वर्षात पाकिस्तानच्या वाटय़ाला अधिकाधिक क्रिकेट येण्यासाठी बीसीसीआयने काहीही केलेले नाही. द्विपक्षीय मालिका सुरू करण्याबाबत नेहमीच अनुत्सुकता दाखवली. इतकी वर्षे पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलेल्या आफ्रिदीचे ‘भारतप्रेम’ इतके उतू जाईल, असे वाटले नव्हते. त्याच्या वक्तव्याने धक्का बसला,’’ असे मियांदाद म्हणाला.

पाकिस्तान बोर्डाने आफ्रिदीच्या वक्तव्याची गंभीर दखल घ्यायला हवी. पाकिस्तानचे क्रिकेटपटू परदेश दौ-यावर असताना प्रसारमाध्यमांसमोर कसे बोलावे, याचे प्रशिक्षण द्यावे, अशी सूचनाही मियांदादने केली आहे. ‘‘भारतात जाऊन टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी, हे क्रिकेटपटूंचे काम आहे. त्यामुळे आफ्रिदीला तसे वक्तव्य करण्याची आवश्यकता नव्हती,’’ असे मियांदादने सांगितले.

पाकिस्तानचा माजी मुख्य प्रशिक्षक मोहसीन खाननेही आफ्रिदीसह शोएब मलिकच्या भारतप्रेमाच्या उमाळ्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘‘परदेशात (मुख्यत्वे भारतात) मीडियाशी बोलताना सीनियर क्रिकेटपटूंनी काळजी घ्यावी,’’ असा सल्ला खान यांनी दिला आहे.
()

Viewed 55 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1