DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
12:48 PM | Wed, 25 May 2016

Download Our Mobile App

Download Font

पद्म विभूषण, पद्म भूषण व पद्मश्री पुरस्कार जाहीर

120 Days ago
| by Prahaar

Ujjwal-Nikam

केंद्र सरकारने सोमवारी पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली. यावेळेस ११८ जणांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली. यावेळेस ११८ जणांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

यावेळी प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तर बॉलिवूडचे सुपरस्टार रजनीकांत, रिलायन्स समुहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी, माध्यमसम्राट रामोजीराव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटनपटू सानिया नेहवाल, अभिनेते अनुपम खेर, अजय देवगण, प्रियांका चोप्रा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याने फार आनंद झाला आहे. हा दिवस आयुष्यातील सर्वात चांगला दिवस असल्याचे अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

पद्म विभूषण

यामिनी कृष्णमूर्ती- भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्यांगना

रजनीकांत- अभिनेता

श्री श्री रविशंकर- आर्ट ऑफ लिव्हिंग

रामोजी राव- इनाडू ग्रुपचे सर्वेसर्वा आणि रामोजी फिल्म सिटीचे मालक

जगमोहन- जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल

धीरुभाई अंबानी (मरणोत्तर)- रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक

गिरीजादेवी- शास्त्रीय गायिका

पालनजी शापूरजी मिस्त्री- उद्योजक

पद्म भूषण

अनुपम खेर- अभिनेता

विनोद राय- माजी कॅग

उदित नारायण- पार्श्वगायक

राम सुतार- शिल्पकार

सायना नेहवाल- बॅडमिंटनपटू

सानिया मिर्झा- टेनिसपटू

पद्मश्री

उज्वल निकम- विशेष सरकारी वकील

दीपिका कुमारी- तिरंदाज

अजय देवगण- अभिनेता

प्रियांका चोप्रा- अभिनेत्री

एसएस राजामौली- लेखक-दिग्दर्शक

मधुर भांडारकर- दिग्दर्शक

रॉबर्ट डी ब्लॅकविल- भारतातील माजी अमेरिकन राजदूत

इंदू जैन- अध्यक्ष, टाइम्स ऑफ इंडिया, (बेनेट, कोलमन)
()

Viewed 56 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1