DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
08:36 PM | Tue, 28 Jun 2016

Download Our Mobile App

Download Font

पाकिस्तानचे अंपायर रौफ यांच्यावर पाच वर्षाची बंदी

137 Days ago
| by Prahaar

Asad-Rauf-120216

आयपीएल मॅचफिक्सिंग आणि बेटिंगप्रकरणी पाकिस्तानचे अंपायर असद रौफ यांच्यावर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने पाच वर्षाची बंदी घातली.

मुंबई- आयपीएल मॅचफिक्सिंग आणि बेटिंगप्रकरणी पाकिस्तानचे अंपायर असद रौफ यांच्यावर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने पाच वर्षाची बंदी घातली. शिस्तपालन समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

२०१३ आयपीएलमध्ये बेटिंग लावणा-या सट्टाबाजांकडून रौफ यांनी महागडय़ा भेटवस्तू घेतल्याचे सिद्ध झाले आहे. त्यावेळी ते आयसीसी अंपायर्सच्या एलिट पॅनेलचे सदस्य होते. ‘‘अनेक वेळा समन्स बजावूनही रौफ हे बीसीसीआय शिस्तपालन समितीसमोर हजर झाले नाहीत.

मात्र त्यांनी १५ जानेवारी आणि ८ फेब्रुवारीला लेखी स्वरुपात म्हणणे मांडले. त्याच्या आधारे बीसीसीआयने त्यांच्यावर पाच वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत त्यांना आयसीसी संलग्न बोर्डाच्या कुठल्याही सामन्यात अंपायरपद भूषवता येणार नाही,’’ असे बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.

आयपीएल फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणानंतर रौफ यांना आयसीसीने अंपायर्सच्या एलिट पॅनेलवरून दूर केले होते. आयपीएल फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी कारवाई झालेले रौफ पहिलेच अंपायर आहेत.

या प्रकरणी गेल्या महिन्यात राजस्थान रॉयल्सचा ऑफस्पिनर अजित चंडिलावर आजीवन तसेच मुंबईचा रणजीपटू हिकेन शाहवर पाच वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीत बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहरसह ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शाह यांचा समावेश आहे. ()

Viewed 58 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1