DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
08:18 AM | Sun, 26 Jun 2016

Download Our Mobile App

Download Font

पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटात ११ ठार

158 Days ago
| by Prahaar

Peshawar

पाकिस्तानमधील पेशावर येथील एका तपासणी नाक्यावर मंगळवारी सकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा सुरक्षा रक्षकांसह ११ जण ठार झाले.

पेशावर- पाकिस्तानमधील पेशावर येथील एका तपासणी नाक्यावर मंगळवारी सकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा सुरक्षा रक्षकांसह ११ जण ठार झाले. अन्य १७ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी पेशावरमधील रुग्णालयात दाखल केले आहे.

हा बॉम्बस्फोट जमरूड भागात तपासणी नाक्‍यावर झाला, अशी माहिती पोलीस अधिकारी मुबारक झेब खान यांनी दिली. हा परिसर तालिबान क्षेत्रापासून पेशावरला जाणा-या तपासणी नाक्याजवळच आहे. घटनास्थळाच्या दुस-या बाजूस अफगाणिस्तानची सीमा आहे.

मृतांमध्ये सहा सुरक्षारक्षक, चार स्थानिक नागरिक आणि एका लहान मुलाचाही समावेश आहे. हा बॉम्बस्फोट एका आत्मघातकी हल्लेखोराने घडवून आणला असून तो हल्लेखोर तपासणी नाक्याजवळ येताच त्याने स्वत:ला उडवून घेतल्याचे खान यांनी सांगितले.

दरम्यान, हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.

()

Viewed 49 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1