DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
10:13 PM | Mon, 27 Jun 2016

Download Our Mobile App

Download Font

बहिणीने पुस्तक फाडल्याने भावाची आत्महत्या

122 Days ago
| by Prahaar

suicide-260216

घरात अभ्यास करताना आपल्या १२ वर्षाच्या मोठय़ा बहिणीने अभ्यासातील एक पुस्तक फाडल्याने तसेच टीव्हीचे कार्यक्रम बघताना वारंवार रिमोट हिसकावून घेतल्याने निराश झालेल्या एका ११ वर्षीय चिमुरडय़ाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे.

कल्याण - घरात अभ्यास करताना आपल्या १२ वर्षाच्या मोठय़ा बहिणीने अभ्यासातील एक पुस्तक फाडल्याने तसेच टीव्हीचे कार्यक्रम बघताना वारंवार रिमोट हिसकावून घेतल्याने निराश झालेल्या एका ११ वर्षीय चिमुरडय़ाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. दुग्रेश प्रभुनाथ सोनी असे या मुलाचे नाव असून तो कल्याणच्या वालधुनी भागात राहात होता.

बुधवारी रात्री दहा वाजता दुर्गेश अभ्यास करत असताना त्याच्या मोठय़ा बहिणीने त्याचे पुस्तक फाडले होते. यामुळे त्यांच्यात भांडणे झाली होती. त्यानंतर दुग्रेश टीव्ही बघत असताना त्याच्या बहिणीने रिमोट हिसकावत तिच्या आवडीचे चॅनल लावले होते. या प्रकारामुळे आपला अपमान झाल्याची भावना दुर्गेशच्या मनात होती. यातूनच त्याने रात्रीच्या सुमारास घराच्या बेडरुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

दुर्गेशला वडिल नसून त्याची आई दोन्ही मुलांसह वालधुनीतल्या शिवाजी नगर येथील बिहारी चाळीत राहात आहे. या प्रकारानंतर या भागात खळबळ माजली असून लहान मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पांढरे यांनी व्यक्त केली आहे
()

Viewed 34 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail
You might also want to read

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1