DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
05:54 AM | Mon, 27 Jun 2016

Download Our Mobile App

Download Font

मुंबईकरांच्या नशिबी लटकूनच प्रवास!

121 Days ago
| by Prahaar

THANE-RUSH-260216

गुरुवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वेच्या अर्थसंकल्पात मुंबईकर आणि विशेषत: ठाणे-कल्याण पट्टय़ातील रेल्वे प्रवाश्यांच्या तोंडाला अक्षरश: पाने पुसण्यात आली आहेत.

ठाणे - गुरुवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वेच्या अर्थसंकल्पात मुंबईकर आणि विशेषत: ठाणे-कल्याण पट्टय़ातील रेल्वे प्रवाश्यांच्या तोंडाला अक्षरश: पाने पुसण्यात आली आहेत. या भागातील वाढत्या गर्दीमुळे मागील काही दिवसांत प्रचंड अपघात घडले होते. त्यात जवळपास डझनभर रेल्वे प्रवाशांना प्राणाला मुकावे लागले होते. मात्र त्यानंतर आपल्यासाठी महाराष्ट्राचे असलेले रेल्वेमंत्री काहीतरी करतील, ही लोकल प्रवाशांची अपेक्षा फोल ठरली असून त्यांच्या नशिबी लटकून प्रवास करणेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या रेल्व्चे बजेटमध्ये सीएसटी-पनवेल एलिव्हेटेड रेल्वेमार्ग आणि मुरबाड-टिटवाळा रेल्वेमार्गाचा सव्‍‌र्हे या दोन घोषणा वगळता मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला काहीही मिळालेले नाही. मध्य रेल्वेच्या लोकल फे-या वाढाव्यात, पश्चिम रेल्वेच्या धर्तीवर संपूर्ण उपनगरीय रेल्वे पट्टय़ात लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग असावा, कर्जत, कसारा आणि डहाणू लोकलची संख्या वाढावी, कल्याण वाशी रेल्वेमार्ग व्हावा, तसेच ठाणे ते कल्याण कसारा मार्गावर गर्दीच्या वेळेत १५ डब्यांच्या लोकल चालवाव्यात अशा लोकल प्रवाशांच्या काही प्रमुख मागण्या होत्या. मात्र यापैकी एकही मागणी पूर्ण झालेली नसून त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

 अर्थसंकल्पाकडून निराशा

रेल्वेमंत्र्यांनी उपनगरीय रेल्वे प्रवाश्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. हे निराशाजनक रेल्वे बजेट आहे. लोकलमधून पडून रोज १० ते १२ जणांचा मृत्यू होतो, हे रोखण्यासाठी यात काहीही उपायोजना नाही. यातील मृतांच्या कुटुंबाची होणारी वाताहत पाहता याबाबत काहीतरी निर्णय घेऊन रेल्वेमंत्र्यांनी दिलासा द्यावा.  - नारायण शेलार व दत्तात्रय गोडबोले, रेल्वे प्रवासी संघटना, डोंबिवली.

लोकल प्रवासी वा-यावर
या बजेटमध्ये प्रचंड उत्पन्न देणा-या लोकल प्रवाशांना वा-यावर सोडण्यात आले आहे. वाढीव फे-या आणि सुरक्षेबाबत प्रवाशांचा अपेक्षाभंग झाला आहे. - शैलेश राऊत, के ३ रेल्वे प्रवासी संघटना.

 अपेक्षाभंग झाला
या बजेटने ग्रामीण भागातील प्रवाशांचा अपेक्षाभंग केला आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील ४० लाख प्रवाशांसाठी यात काहीही नाही. कल्याण-कसारा यादरम्यानच्या लोकल फे-या वाढविण्याची गरज होती. त्यामुळे हा निराशानजक अर्थसंकल्प आहे. - जितेंद्र विशे, कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटना.

हा तर श्रीमंतांसाठीचा अर्थसंकल्प!
या अर्थसंकल्पाबाबत कल्याण लोकसभेचे माजी खासदार आनंद परांजपे यांना प्रतिक्रिया विचारली असता, या अर्थसंकल्पात सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी काहीही नवीन देण्यात आलेले नाही. लोकल प्रवाश्यांच्या समस्या रेल्वेमंत्र्यांनी सोडविणे गरजेचे होते. मात्र त्यांनी तरकेवळ डिजिटल अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी नसून ‘एलिट’ क्लाससाठी आहे, अशा शब्दांत त्यांनी या अर्थसंकल्पावर टीका करत नाराजी व्यक्त केली.


()

Viewed 12 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail
You might also want to read

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1