DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
03:46 AM | Tue, 31 May 2016

Download Our Mobile App

Download Font

विजय मल्ल्यासाठी अजामीनपात्र वॉरंट

77 Days ago
| by Prahaar

vijay-140316SS

देशातील १७ बँकांचे सुमारे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय मल्ल्या याने हैदराबादच्या जीएआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडलाही पन्नास लाख रुपयांना फसवले आहे.

नवी दिल्ली - देशातील १७ बँकांचे सुमारे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय मल्ल्या याने हैदराबादच्या जीएआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडलाही पन्नास लाख रुपयांना फसवले आहे. विमानतळ कंपनीला मल्ल्या याने दिलेला ५० लाख रुपयांचा धनादेश वटला नसून, या प्रकरणी न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल हैदराबाद न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यामुळे मल्ल्या याच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

मल्ल्याच्या वकिलाने हे वॉरंट रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. हैदराबाद विशेष महादंडाधिकारी न्यायालयाचे १४ वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी १० मार्च रोजी मल्ल्यासह किंगफिशर एअरलाईन्सच्या एका वरिष्ठ अधिका-याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणात न्यायालयीन सुनावणीसाठी १३ एप्रिलची तारीखही देण्यात आली आहे.

देशातील विविध बँकांचे सुमारे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी मल्ल्या आधीच गोत्यात आला आहे. या प्रकरणात आपल्या गळय़ाभोवती कारवाईचा फास आवळणार असल्याचे लक्षात येताच २ मार्च रोजी त्याने भारत सोडून लंडनला पयालयन केले होते. जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्टचे सल्लगार जी. अशोक रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, ‘मल्ल्या आणि त्याच्या इतर सहका-यांविरोधात १० मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र तो कोर्टात हजर न झाल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

मल्ल्यासह इतर कर्जबुडव्या आणि हेकेखोर उद्योजकांना कायद्याच्या कचाटय़ात पकडण्यासाठी संपूर्ण कायदेतज्ज्ञांची फळी उभी करणार असल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी नुकतेच म्हटले आहे. मात्र या कर्जबुडव्या उद्योजकांपैकी कुणाचेही नाव घेणे त्यांनी टाळले. जीएमआरला सुमारे ८ कोटी रुपये देणे असल्याचे अकरा विविध खटले आणि ५० लाख रुपयांचे चेक बाउन्स प्रकरण मल्ल्याला चांगलेच शेकणार आहे. हैदराबादमधील राजीव गांधी विमानतळ प्रशासनाने मल्ल्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात कर्जबुडवेगिरी, फसवणूक आणि चेक बाउन्सच्या प्रकरणांचा उल्लेख आहे.
()

Viewed 45 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail
You might also want to read

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1