DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
10:43 PM | Sun, 26 Jun 2016

Download Our Mobile App

Download Font

सनी लिओन मराठी चित्रपटात झळकणार ?

165 Days ago
| by Prahaar

sunny-leone

बॉलिवूडमध्ये अगदी अल्पावधीत चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री सनी लिओन मराठीत पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे.

नवी दिल्ली – बॉलिवूडमध्ये अगदी अल्पावधीत चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री सनी लिओन मराठीत पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे.

एका मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये सनीने लावणीवर नृत्य केले. त्यामुळे सनीच्या चाहत्यांची तिने मराठीत काम करावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

हिंदी चित्रपटांनतर सनी आता मराठीत पदार्पण करणार असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. सनी आता मराठी बोलायला शिकत असल्याने ती नक्कीच मराठीत येणार असल्याची उत्सुकता आहे.

यासंदर्भात सनीला एका मुलाखतीमध्ये विचारले असता तिने आपण मराठीत काम करायला काहीही हरकत नसल्याचे सांगितले. सनीने मराठीतील ‘हळू हळू’ आणि ‘नको नको’  असे साधे शब्द शिकण्यास सुरूवात केल्याचे बोले जात आहे.

सनीने  मराठी चित्रपटात काम करण्यासाठी एक अट घातली आहे. ‘जर चित्रपटाची कथा चांगली असेल तर मीे नक्कीच मराठी चित्रपटात काम करेन’  असे ती म्हणाली. मराठी संस्कृतीत आणि भाषेमध्ये एक निराळाच गोडवा असल्याचेही तिने सांगितले.

‘मराठी चित्रपटांचे बजेट बॉलिवूडच्या तुलनेने कमी असल्याने ती कथेला की पैशांना अधिक प्राधान्य देईल, असे विचारल्यावर तिने चटकन ‘अर्थातच आशय’ असे म्हटले. त्यासाठी मानधनात तडजोड सुद्धा करेन, असे सनीने सांगितले.
()

Viewed 39 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail
You might also want to read

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1