DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
07:36 PM | Sat, 25 Jun 2016

Download Our Mobile App

Download Font

सिरियामध्ये बॉम्बस्फोटात १५० ठार

124 Days ago
| by Prahaar

bomb

सिरियातील होम्स शहरात भीषण बॉम्बस्फोट झाले असून यामध्ये १५० जणांचा मृत्यू झाला आहे.

सैयदा जैनब- सिरियातील होम्स शहरात भीषण बॉम्बस्फोट झाले असून यामध्ये १५० जणांचा मृत्यू झाला आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. रविवारी उशिरा रात्री हा स्फोट घडवून आणला.

होम्स शहरात दोन ठिकाणी झालेल्या कार बॉम्बस्फोटात ५७ नागरिकांचा मृत्यू झाला. शिया धर्मियांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले आहेत. तर दमास्कसमधील सैयदा जैनब येथे चार ठिकाणी आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आले. यात ८३ नागरिकांचा मृत्यू झाला.

 अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सीरियातील अंतर्गत युद्ध विरामासाठी रशियाबरोबर एक करार करण्यात आल्याचे म्हटले आहे.  रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी केरी यांनी चर्चा केली, त्यानंतर युद्धबंदीबाबत चर्चा झाली. ()

Viewed 40 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1