DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
07:41 AM | Mon, 27 Jun 2016

Download Our Mobile App

Download Font

स्टिव्हन स्मिथला ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार

186 Days ago
| by Prahaar

smith

आयसीसीच्या वार्षिक पुरस्कारांमधील वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा महत्त्वपूर्ण पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ याने मिळवला आहे.

दुबई- आयसीसीच्या वार्षिक पुरस्कारांमधील वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा महत्त्वपूर्ण पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ याने मिळवला आहे. या पुरस्काराची घोषणा बुधवारी करण्यात आली.

हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा खेळाडू आहे. स्मिथ आधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (२००६), मिचेल जॉन्सन (२०१४ )  आणि मायकेल क्लार्कने (२०१३) असा मान मिळवला आहे.

स्मिथने सर्वोत्तकृष्ट क्रिकेटपटूसह वर्षातील सर्वोत्तकृष्ट कसोटीपटूचा मानही मिळवला. दक्षिण अफ्रिकेचा एबी डेविलियर्स वर्षातील सर्वोत्तकृष्ट वनडे क्रिकेटपटू ठरला आहे.

आयसीसीच्या महत्त्वाच्या दहा पुरस्कारांच्या यादीत एकाही भारतीय क्रिकेटपटूचा समावेश नाही.

गेल्या जून महिन्यात स्मिथ हा आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान मिळविणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.

सर्वोत्तकृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवणा-या स्टिव्हन स्मिथने यंदाच्या वर्षात १३ कसोटी सामन्यात ८२.५७च्या सरासरीने २५ डावांमध्ये १, ७३४ धावा केल्या आहेत. यामध्ये सात शतके तर सहा अर्धशतकांचा सामावेश आहे.

()

Viewed 57 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail
You might also want to read

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1