DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
07:52 PM | Fri, 27 May 2016

Download Our Mobile App

Download Font

स्मार्ट सिटीजसाठी १५० अब्ज डॉलर्सची गरज

116 Days ago
| by Prahaar

smart-city

मोदी सरकार स्मार्ट सिटीच्या बाता मारत असले तरीही त्यासाठी प्रत्यक्षात तब्बल १५० अब्ज डॉलर इतका निधी लागणार आहे. खासगी गुंतवणुकी शिवाय त्यासाठी पर्याय नाही.

मुंबई- मोदी सरकार स्मार्ट सिटीच्या बाता मारत असले तरीही त्यासाठी प्रत्यक्षात तब्बल १५० अब्ज डॉलर इतका निधी लागणार आहे. खासगी गुंतवणुकीशिवाय त्यासाठी पर्याय नाही. परंतु इतका निधी मिळवणे सरकारला अशक्य असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. मोदी सरकार केवळ स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवत आहे, असे मत व्यक्त होत आहे. स्मार्ट शहरांसाठी इतका मोठा निधी आणणार कुठून, हा मुख्य प्रश्न अनुत्तरितच आहे.

डेलॉईट या संस्थेने हा अभ्यास केला असून त्यांनी खासगी गुंतवणुकीतून १२० अब्ज डॉलर आणावे लागतील, असे म्हटले आहे. सरकारने स्मार्ट सिटी मिशन या नावाने अगोदरच कार्यक्रम सुरू केला असून ५०० शहरांतील सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी अमृत योजना लागू केली आहे. स्मार्ट शहरे विकसित करण्यासाठी निधी कुठून आणणार, हा चिंतेचा मुद्दा आहेच. परंतु स्मार्ट शहरांचे प्रकल्प व्यवस्थापन, सरकारी निर्णयप्रक्रिया आणि धोरण व नियामक चौकट हे प्रमुख मुद्दे चिंतेचे आहेत, असे डेलॉईट इंडियाचे वरिष्ठ संचालक पी.एन. सुदर्शन यांनी सांगितले.

सरकारने नुकतीच पहिल्या २० स्मार्ट शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात पुणे, सोलापूर या महाराष्ट्रातील शहरांचा समावेश केला आहे. स्मार्ट शहरांसाठी वाढीव गुंतवणूक करण्यात आली असली तरीही मोठय़ा प्रमाणावर त्याची पुनरावृत्ती करणे हे मोठे आव्हान आहे, असे सुदर्शन म्हणाले. स्मार्ट सोल्युशन्स प्रचंड प्रमाणावर आयसीटीवर अवलंबून असल्याने सेवा पुरवठादार कंपन्या स्मार्ट शहरांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील,असे त्यांनी सांगितले.

रिलायन्स जियो २०१६ मध्ये ५० हून अधिक शहरांत वायफाय सेवा सुरू करतील. फेसबुक बीएसएनएलच्या सहकार्याने ग्रामीण भारतातील १०० भागांत वायफाय सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नांत आहे तर गुगलने ४०० रेल्वे स्थानकांत वायफाय सेवा सुरू करण्यासाठी भागीदारी जाहीर केली आहे.
()

Viewed 22 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1