DOWNLOAD OUR APP
IndiaOnline playstore
08:28 PM | Mon, 27 Jun 2016

Download Our Mobile App

Download Font

हरियाणात ३० गाड्या आदळून विचित्र अपघात

138 Days ago
| by Prahaar

haiyana

हरियाणातील करनालमध्ये ३० गाड्या एकमेकांना आदळून विचित्र अपघात झाला. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

हरियाणा- हरियाणातील करनालमध्ये ३० गाड्या एकमेकांना आदळून विचित्र अपघात झाला. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हरियाणातील निलाखेडी येथे राष्ट्रीय महामार्ग एकवर हा अपघात झाला.   पहाटेच्या सुमारास एक ट्रक बंद पडला होता. त्या ट्रकला मागून येणा-या कारने जोरदार धडक दिली. त्यानंतर दाट धुक्यामुळे समोरचे काहीही दिसत नसल्याने सुमारे तीस गाड्या एकापाठोपाठ एक परस्परांवर आदळल्या.

या अपघातात एकाच गाडीतील चारजणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून ते लखनऊवरून अमृतसर येथे लग्नाला जात असल्याचे समजते.

बंद पडलेल्या ट्रकचा मागच्या बाजूने संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे. तर त्या ट्रकला मागून येणा-या कारची इतकी भीषण धडक झाली की ती कार संपूर्ण ट्रकच्या खाली गेली. त्यामुळे कारच्या पुढच्या भागाचा चुराडा झाल्याचे समजते.

‘दाट धुक्यांमुळे समोरचे स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे चालकाला नियंत्रण राखता आले नाही,’ अशी माहिती महामार्ग गस्त अधिकारी मनोज कुमार यांनी दिली. ()

Viewed 35 times
  • SHARE THIS
  • TWEET THIS
  • SHARE THIS
  • E-mail
You might also want to read

Our Media Partners

app banner

Download India's No.1 FREE All-in-1 App

Daily News, Weather Updates, Local City Search, All India Travel Guide, Games, Jokes & lots more - All-in-1