आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

अझीम प्रेमजींसंदर्भात ‘व्हायरल पोस्ट’ चुकीची

News

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी ५० हजार कोटी दान करण्याची घोषणा केल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अझीम प्रेमजी आणि विप्रो कंपनीकडून या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या कंपनीचे ५२,७५० कोटी किंमतीचे शेअर्स चॅरिटीला दान केले होते. एकूण संपत्तीच्या ३४ टक्के भाग त्यांनी दान दिली होती. ही संपत्ती २०१९ साली दान करण्यात आली होती. त्यावेळी जगभरात एवढी मोठी रक्कम चॅरिटीला देणारे अझीम प्रेमजी पहिले होते. सध्या असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण अझीम प्रेमजी यांच्याकडून देण्यात आले आहे.

अझीम प्रेमजी फाउंडेशनचे शिक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान आहे. या संस्था देशातील अनेक क्षेत्रात कार्यरत असून त्या-त्या राज्य सरकारसोबत भागिदारी केली आहे. अजीम प्रेमजी फाउंडेशनचे कार्य देशाच्या उत्तर-पूर्व राज्यांशिवाय कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगड, पुदुच्चेरी, तेलंगाणा आणि मध्य प्रदेशाही विस्तारले आहे.

(PRAHAAR)

64 Days ago