आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

अनुपम खेर यांच्या आईसह चौघांना कोरोना

News

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आता अनुपम खेर यांच्या आईसह भाऊ आणि कुटुंबातील चार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनुपम खेर यांनी रविवारी सकाळी ट्विट करून याची माहिती दिली.

अनुपम यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की, काही दिवसांपासून त्यांची आई दुलारीची तब्येत बिघडली होती. तिला भूक लागत नव्हती आणि ती झोपूनच रहायची. डॉक्टरांच्या सांगण्यावरून सुरुवातीला रक्ताची चाचणी घेण्यात आली. ज्यात सर्व काही ठिक दिसले. नंतर सीटी स्कॅन केले आणि त्यानंतर कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

यानंतर अनुपम आणि त्यांचे भाऊ राजू यांनी कोरोनाची टेस्ट केली. यात अनुपम यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर राजू यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली. यात अनुपम यांची वहिनी म्हणजे राजू यांची पत्नी आणि भाची वृंदाही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. यात त्यांच्या भाच्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

(PRAHAAR)

80 Days ago

Download Our Free App

Advertise Here