आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

अभिनेता सोनू सूदला पोलिसांनी वांद्रे टर्मिनस बाहेर रोखले

news

मुंबई (प्रतिनिधी) : वांद्रे टर्मिनस येथून श्रमिक ट्रेनने उत्तर प्रदेशला निघालेल्या मजुरांच्या भेटीसाठी गेलेल्या अभिनेता सोनू सूदला पोलिसांनी रेल्वे स्थानकाबाहेरच रोखले. त्यामुळे सोनू सूदला मजुरांना न भेटताच वांद्रे टर्मिनसच्या बाहेरुनच प्रवाशांचा निरोप घेऊन परतावे लागले.

वांद्रे टर्मिनसवरुन सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास श्रमिकांची विशेष ट्रेन उत्तर प्रदेशसाठी रवाना झाली. या ट्रेनने उत्तर प्रदेशला जाणाऱ्या मजुरांच्या भेटीसाठी सोनू सूद वांद्रे टर्मिनस येथे जाणार होता. सोनू सूद मजुरांच्या भेटीसाठी वांद्रे टर्मिनस येथे पोहोचल्यावर पोलिसांनी त्याला प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून रोखलं. त्यामुळे मजुरांना न भेटताच सोनू सूद परतला.

अभिनेता सोनू सूदने परप्रांतीयांना आपापल्या घरी जाण्यास मदत केल्याच्या कामगिरीवर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

(PRAHAAR)

65 Days ago

Download Our Free App

Advertise Here