अमेरिका आणि सहयोगी राष्ट्रांच्या इराकमधल्या हवाई तळांवर रॉकेट हल्ले

News

इराकच्या पश्चिमेला ऐन-अल-असाद इथल्या अमेरिका आणि सहयोगी देशांच्या हवाई तळांवर आज पहाटे ९ रॉकेटचा मारा झाला, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या स्टेफनी ग्रिशम यांनी एका पत्रकात दिली.

त्यांनी पुढे सांगितलं की व्हाईट हाऊस या सर्व गोष्टींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. जीवितहानी संदर्भात अजूनही काही माहिती नसल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. इराकमधले काही इराण समर्थक अमेरिकेविरुद्ध एकत्रित आल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. (AIR NEWS)

50 Days ago