अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी सामन्यात काल भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅथ्यू एब्देन यांना पराभव पत्करावा लागला. राजीव राम आणि ज्यो सॅलिसबरी यांच्या जोडीनं बोपण्णा आणि एब्देन यांचा 6-2,3-6,4-6 असा पराभव केला.
बोपण्णा आणि एब्देन यांनी पहिला सेट जिंकून चांगली सुरुवात केली होती, मात्र नंतर राम आणि सॅलिसबरी यांनी त्यांच्यावर मात केली.महिला दुहेरीत उपांत्य फेरीत एरिन रुटलिफ आणि गॅब्रिएला दाब्रोवस्की यांनी वांग झिन्यू आणि हसिएक सु-वेई यांचा, तर लॉरा सिगेमंड आणि व्हेरा वेनारेवा यांनी जेनिफर ब्रँडी आणि लुइसा स्टेफानिन यांचा पराभव केला.
पुरुषांच्या एकेरीत उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोविचनं बेन शेल्टनचा 6-3,6-2,7-6 असा पराभव केला. गेल्या वर्षीचा विजेता कार्लोस अल्कराझचा आज दानिल मेदवेदेवशी सामना होणार आहे. (AIR NEWS)