आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

अमेरिकी सिनेटकडून महाभियोगाच्या आरोपांमधून अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप दोषमुक्त

news

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालवलेल्या महाभियोगात सिनेटनं त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं आहे. सत्तेचा गैरवापर आणि प्रतिनिधी गृहाची अडवणूक केल्याच्या आरोपावरुन लावलेल्या दोन कलमांमधून सिनेटनं ट्रंप यांना निर्दोष ठरवलं आहे. 52 विरुद्घ 48 मतांनी सत्तेच्या गैरवापराचा आरोप सिनेटनं फेटाळला.

तर प्रतिनिधी गृहाच्या अडवणूकीचा आरोप 53 विरुद्ध 47 मतांनी फेटाळला. अध्यक्षांविरुद्धच्या महाभियोगासाठी डेमॉक्रॅट्रिक पक्षाला 100 सदस्यांच्या सिनेटमधे दोन तृतियांश मतांची गरज होती. मात्र त्यांचे 47 च सदस्य असून रिपब्लीकन पार्टीचे 53 सदस्य आहेत. (AIR NEWS)

53 Days ago

Download Our Free App