A part of Indiaonline network empowering local businesses

अमेरिकेवरच्या कर्जाबाबत जो बायडन यांची रिपब्लिकन केव्हिन मॅकार्थी यांच्याशी चर्चा

news

अमेरिकेवरच्या कर्जाबाबत रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते केव्हिन मॅकार्थी यांच्यासोबतची चर्चा पुढे गेल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिली. अमेरिकेच्या सरकारवरची कर्ज घेण्याची मर्यादा 2 वर्षांपर्यंत वाढवण्याचा या चर्चेचा उद्देश आहे. कर्ज चुकतं करण्याची अमेरिकेची मुदत 1 जून रोजी संपणार आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या आणि पर्यायाने जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी बायडन आणि मॅकार्थी यांच्यात अमेरिकेच्या सरकारवरच्या 31 पूर्णांक 4 ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या कर्जाची मुदत दोन वर्षांपर्यंत वाढवण्याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. या बदल्यात देशाच्या खर्चात कपात करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षानं केली आहे. (AIR NEWS)

125 Days ago