A part of Indiaonline network empowering local businesses

अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

News

अयोध्येतल्या श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता शेवटचे तीन दिवस बाकी आहेत. तयारीआता अंतिम टप्प्यात आली असून रामलल्लाचं दर्शन घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.उद्यापासून २२ जानेवारी पर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद राहील.प्राणप्रतिष्ठेपूर्वीचे विधी सध्या सुरू असून आज देवप्रबोधन, औषध अधिवास, घृतअधिवास, कुंडपूजन, अग्निकुंड स्थापना हे विधी आज पार पडतील. उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्येला भेट देऊन तयारीचा आढावा घेतील. (AIR NEWS)

41 Days ago