अर्थसंकल्पीय अधिवेशन या महिन्याच्या ३१ तारखे पासून सुरु होणार

news

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दोन टप्प्यात चालणाऱ्या या अधिवेशनाचं पहिलं सत्र अकरा फेब्रुवारीपर्यंत तर दुसरं सत्र दोन मार्चपासून तीन एप्रिलपर्यंत चालेल.

३१ जानेवारीला संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

विविध मंत्रालयं आणि विभागांच्या पुरवणी मागण्यांचा विचार करण्यासाठी आणि त्यांचा अहवाल तयार करण्यासाठी स्थायी समित्यांना वेळ मिळावा यासाठी ११ फेब्रुवारीला पहिलं सत्र संपेल आणि त्यानंतर दोन मार्चपासून अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचं कामकाज सुरू होईल, अशी माहिती लोकसभेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. (AIR NEWS)

32 Days ago