आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

आज जागतिक रेडिओ दिवस जगभर साजरा

news

आज जागतिक रेडिओ दिवस आहे. रेडिओबद्दल समाजात जागृती होण्यासाठी तसंच या माध्यमातून धोरणकर्त्यांच्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोचावी, म्हणूनही हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

रेडिओ जनमानसाच्या भावनांना स्पर्श करतो आणि जगातल्या सर्व श्रोत्यांना एकसंघ ठेवतो. रेडिओ आणि विविधता ही या वर्षीची संकल्पना आहे. आजचा दिवस रेडिओ दिवस म्हणून साजरा करावा ही युनेस्कोची घोषणा २०१३ साली संयुक्त राष्ट्र संघानं अधिकृतरित्या स्वीकारली.

माध्यमांमध्ये होणाऱ्या क्रांतिकारी बदलाच्या युगातही रेडिओनं लोकांना एकसंघ ठेवलं आहे, असं मत संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी व्यक्त केलं आहे. (AIR NEWS)

46 Days ago

Download Our Free App