A part of Indiaonline network empowering local businesses

आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

news

सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली. सर्वोच्च न्यायालयानं आपल्या सरकारवर शिक्कामोर्तब केलं आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केलं. या निकालानं आपलं सरकार घटनात्मक ठरवलं आहे, असं ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी खुर्ची करता विचार सोडला, तर मुख्यमंत्री शिंदे यांनी विचाराकरता खुर्ची सोडली असं म्हणत त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे यांनी नैतिकता म्हणून नाही तर भितीपोटी राजीनामा दिला होता अशी टीकाही फडणवीस यांनी केली. दरम्यान आपण नैतिकतेतून राजीनामा दिल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे यांनी केली. (AIR NEWS)

346 Days ago