आशियाई अजिंक्य चषक हॉकी स्पर्धेत काल भारतानं दक्षिण कोरियाचा 3-2 असा पराभव करत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या स्पर्धेत आतापर्यंत भारतानं एकही सामना गमावला नाही. तीन विजय आणि एक सामना अनिर्णीत राहिल्याने भारतानं गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. (AIR NEWS)