आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

आशियाई कुस्ती स्पर्धेत८७ किलो वजनी गटात सूनिल कुमारचं यश

News

नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सूनिल कुमार नं ८७ किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे. त्यानं उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या अझमत कुस्तुबायेव्ह याला १२-८ असं हरवलं. किरगिझीस्तानच्या अझत सालिदिनोव्ह त्याच्याशी त्याची अंतिम फेरीत गाठ पडेल.

५५ किलो वजनी गटात भारताचा अर्जुन हलाकुर्की, इराणच्या मल्ला विरुद्ध उपांत्य फेरीत सात-आठ असा पराभूत झाला. कांस्य पदकासाठी तो आता दक्षिण कोरियाच्या दोंगयोक वोन विरुद्ध लढेल. भारताचे मेहरसिंग, साजन आणि सचिन राणा हे इतर मल्ल मात्र वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये पराभूत झाले. (AIR NEWS)

40 Days ago

Download Our Free App