आसाममध्ये गुवाहाटी इथं खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा सुरू होणार

News

आसाममध्ये गुवाहाटी इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये आजपासून मुष्टियुद्ध, कुस्ती आणि बास्केटबॉल या क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा सुरू होणार आहेत. सायकलिंग, नेमबाजी आणि कुस्तीमधली पदकं आज निश्चित होतील.

स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्रानं आपली आघाडी कायम राखली असून त्यापाठोपाठ हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू, मणीपूर आणि पश्चिम बंगाल ही राज्यं आहेत. (AIR NEWS)

32 Days ago