A part of Indiaonline network empowering local businesses

इटली खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित जोकोविचला पराभवाचा धक्का

News

इटली खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित आणि विद्यमान विजेत्या नोव्हाक जोकोविचला होल्गार रूनकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. सातव्या मानांकित रूनने जोकोविचवर ६-२, ४-६, ६-२ अशी मात केली. त्याआधी झालेल्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या कॅस्पर रूडने फ्रान्सिस्को सेरुंडोलो याचा ७-६, ६-४ असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रूड आणि रून आमने-सामने असतील. महिलांच्या गटात येलेना ऑस्टापेंकोने पॉला बडूसावर ६-२, ४-६, ६-३ नं विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं. (AIR NEWS)

195 Days ago