उत्तर भारतात थंडीची तीव्रता कायम

News

जम्मू-काश्मिरसह संपूर्ण उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी गेले काही दिवस थंडीचा तडाखा कायम असून काश्मिरमधे जोरदार बर्फवृष्टी होत आहे. गेल्या २४ तासात दिल्ली आणि आसपासच्या परिसरात तीन ते पाच अंश सेल्सियस नोंदलं गेलं. लडाखमधे उणे १७ ते उणे २९ अंश सेल्सियस तापमान आहे. हरयाणा, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि लेह इथं कडाक्याची थंडी आहे.

काश्मिरमध्ये 'चिल्लई कालन' हा अतिशीत कालखंड २१ डिसेंबरपासून सुरु झाला आहे. ज्यामुळे राजधानी श्रीनगरसह बहुतांश भागात तापमान शून्याच्या खाली गेले आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली,उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, इथं पुढचे पाच दिवस कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. (AIR NEWS)

53 Days ago