एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल पुण्यात झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंका संघ ४९व्या षटकात २४१ धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानच्या संघानं हे लक्ष्य ४५व्या षटकात तीन गडी गमावत पूर्ण केलं. आज या स्पर्धेत कोलकाता इथं पाकिस्तान आणि बांग्लादेश दरम्यान सामना होणार आहे. (AIR NEWS)