इस्राएलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन अजय’ अभियान सुरु केलं आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या अंतर्गत एक विशेष विमान आज रात्री तेल अविवला पोचेल. उद्या सकाळी हे विमान भारतात परत येईल. त्यात २३० प्रवासी असतील, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं. इस्रायलमधे १८ हजार भारतीय नागरिक आहेत, या सर्वांनी तिथल्या भारतीय दूतावासात नोंदणी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं. (AIR NEWS)