भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान नागपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं काल दुसऱ्या दिवसअखेर, सात बाद ३२१ धावा केल्या.
कर्णधार रोहित शर्मानं सर्वाधिक १२० धावा केल्या असून, क्रिकेटच्या तीनही प्रकारात कर्णधार म्हणून शतक झळकवणारा रोहित पहिला फलंदाज ठरला आहे.
रविंद्र जडेजा ६६ तर अक्षर पटेल ५२ धावांवर खेळत आहेत. भारतानं पहिल्या डावात १४४ धावांची आघाडी घेतली आहे. (AIR NEWS)