भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल मुंबईत झालेल्या मर्यादित षटकांच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 188 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने 61 चेंडू राखत उद्दिष्ट पूर्ण केले. भारताकडून मोहमद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 गाडी बाद केले.
फलंदाजीत भारताची सुरुवात डळमळीत झाली होती. मात्र के एल राहुलच्या नाबाद 75 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर भारताने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतला दुसरा सामना उद्या विशाखापट्टणम इथं होणार आहे. (AIR NEWS)