कुष्ठरोगमुक्त भारताचं स्वप्न सरकारच्या प्रयत्नांनी आणि समाजाच्या पाठिंब्याने साकार होईल असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय कुष्ठरोग विरोधी दिन कार्यक्रमाला ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करीत होते. चला कुष्ठरोगाशी लढूया आणि कुष्ठरोग इतिहासजमा करुया” ही यावर्षीची संकल्पना आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम ही महात्मा गांधीजींना आदरांजली आहे असं ते म्हणाले. लवकर निदान, अपंगत्व आणि व्यंग रोखण्यासाठी मोफत उपचार तसेच सध्या कुष्ठरोगामुळे व्यंग असलेल्यांचे वैद्यकीय पुनर्वसन यावर कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम लक्ष केंद्रित करतो. अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाबाबत दिली. व्यंग दूर करणाऱ्या शस्त्रक्रियेसाठीचं अर्थसहाय्य 8 हजार रुपयांवरून 12 हजार रुपये करण्यात आलं आहे, असं त्या म्हणाल्या. (AIR NEWS)