A part of Indiaonline network empowering local businesses

खलिस्तान समर्थक घटकांकडून ब्रिटनमधील आश्रयाचा भारताविरुद्ध गैरवापर होत असल्याचा भारताचा इशारा

News

भारतातील दहशतवादी कारवायांना मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी खलिस्तान समर्थक घटकांकडून ब्रिटनमधील आश्रयाचा गैरवापर होत असल्याबद्दल भारतानं चिंता व्यक्त केली आहे. तसंच ब्रिटनमध्ये असलेल्या खलिस्तान समर्थक अतिरेक्यांवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करण्याची विनंती भारतानं ब्रिटनला केली आहे.नवी दिल्ली इथं झालेल्या पाचव्या भारत-ब्रिटन गृहव्यवहार संवादादरम्यान भारतानं भारतीय उच्चायुक्तालयाच्या सुरक्षिततेच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त केली. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांनी केलं तर ब्रिटनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व गृह खात्याचे स्थायी सचिव सर मॅथ्यू रायक्रॉफ्ट यांनी केलं. (AIR NEWS)

50 Days ago