राज्य सरकार खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस १५ जानेवारी हा महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार आहे. शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराची रक्कम ३ लाखांवरून वाढवून ५ लाख रक्कम केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुण्यातल्या बालेवाडी इथं आज शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांनी २०१९-२० या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार श्रीकांत शरदचंद्र वाड यांना प्रदान केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. (AIR NEWS)