खेलो इंडिया स्पर्धेत आज रंगणार व्हॉलीबॉलचे अंतिम सामने

News

गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉलचे अंतिम सामने आज होणार आहे. सायकलींग, नमेबाजी आणि खोखोचे सामनेही आज होणार आहेत.

दरम्यान, पदकतालिकेत २६ सुवर्ण पदकं मिळवत एकूण १०७ पदकांसह महाराष्ट्र पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर ६७ पदकं मिळवत हरयाणा दुस-या स्थानावर आहे. यात २१ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. १७ सुवर्ण पदकांसह दिल्ली तिस-या स्थानावर आहे. (AIR NEWS)

43 Days ago