A part of Indiaonline network empowering local businesses

खेलो इंडिया स्पर्धेत महराष्ट्राच सुवर्ण पदकांचं शानदार अर्धशतक पूर्ण

news

चेन्नईमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत गतविजेत्या महाराष्ट्र संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सुवर्ण पदकांचं अर्धशतक साजरं केला.महाराष्ट्राने काल ८ सुवर्ण,८ रौप्य आणि चार कास्य अशा एकंदर वीस पदकांची कमाई केली.राज्याच्या एकंदर पदकांची संख्या आता १४९ झाली आहे.काल जलतरणामध्ये पलक जोशी हीने सुवर्ण पदक पटकावलं.तिरंदाजीमध्ये महाराष्ट्राच्या संघाने ३ सुवर्ण पदकांसह पदकांचा षटकार ठोकला. आदिती स्वामी हीने दुहेरी सुवर्णपदक मिळवलं.कुस्तीमध्ये अर्जुन गादेकर याने सुवर्ण कामगिरी केली.तर खोखोमध्ये दोन्ही गटात राज्याला अजिंक्यपद मिळालं. (AIR NEWS)

29 Days ago