मध्य रेल्वेने गणपती उत्सवादरम्यान प्रवास सुकर करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. सणाला होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे, गणेश चतुर्थीच्या अगोदर 156 विशेष गाड्या चालवणार आहे. गणपती उत्सवादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, पनवेल आणि सावंतवाडी, रत्नागिरी, पुणे, करमाळी, कुडाळ या स्थानकांसह विविध मार्गांवर या गाड्या धावतील. (AIR NEWS)