A part of Indiaonline network empowering local businesses

गाझामध्ये इस्राईलच्या आणखी फौजांचा प्रवेश

news

गाझामध्ये शनिवारी रात्री इस्राईलच्या आणखी फौजांनी प्रवेश केला आहे. हमासशी संबंधित ४५० ठिकाणांवर विमानांनी हल्ला केल्याचं इस्राईलच्या लष्करानं सांगितलं.हमास संघटनेनं ७ ऑक्टोबरला इस्राईलवर केलेल्या हल्ल्यात चौदाशे जणांचा मृत्यू झाल्यानंतर आणि २३० जणांना ओलीस ठेवण्यात आल्यानंतर इस्राईलनं गाझावर बॉंबहल्ले सुरू केले आहेत. त्यात सुमारे आठ हजार जणांचा मृत्यू झाल्याचं त्या प्रदेशाच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.दरम्यान गाझा शहरातील अल कद्स हे रुग्णालय रिकामं करायला इस्राईलनं सांगितल्याचं पॅलेस्टाईनच्या रेड क्रिसेंटनं सांगितलं आहे. मात्र, या रुग्णालयात अनेक रुग्ण अतिदक्षता विभागात असून, अर्भकं इन्क्युबेटर्समध्ये असल्यानं त्यांना तिथून हलवणं अशक्य असल्याचं रेड क्रिसेंटनं म्हटलं आहे.दरम्यान इजिप्तमधून सुमारे तीन डझन ट्रक मदत घेऊन काल गाझामध्ये पोचले. मात्र, गरज पाहता ही मदत अपुरी असल्याचं तिथल्या स्वयंसेवकांचं म्हणणं आहे. (AIR NEWS)

40 Days ago