चांद्रयान ३ चं लँडर मॉड्युलनं आज चंद्राच्या आणखी जवळ पोचलं. चंद्राच्या जवळच्या कक्षेत हे यान पोचवण्याची प्रक्रीया आज दुपारी यशस्वी झाल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं कळवलं आहे. आणखी जवळच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया रविवारी पहाटे पार पाडली जाणार आहे. येत्या बुधवारी चांद्रयान ३ चंद्रावर अलगद उतरवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. (AIR NEWS)