A part of Indiaonline network empowering local businesses

चांद्रयान 3 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

News

चांद्रयान 3 काल चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे क्षेपित करण्यात आल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं ट्विटरद्वारे दिली आहे. चांद्रयानानं आता चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून ते अनेक परिक्रमा करत हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागाच्या अधिकाधिक जवळ पोहोचेल. यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या वर शंभर किलोमीटर अंतरावरच्या कक्षेत पोहोचल्यानंतर लँडर आणि रोव्हर चांद्रयानापासून विलग करून ते अलगदपणे पृष्ठभागावर उतरवणं हा या मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असेल.

23 ऑगस्टच्या आसपास चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या भागात ते उतरविलं जाणं अपेक्षित आहे. त्यावेळी चंद्रावर दिवस असल्यास ते चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरवलं जाईल. अन्यथा ही प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात करण्यात येईल. चंद्रावरचा एक दिवस पृथ्वीवरच्या 29 दिवसांच्या कालावधीएवढा असतो.
(AIR NEWS)

53 Days ago