जम्मू-काश्मीरमध्ये आज उधमपूर जिल्ह्यात पादचारी पूल कोसळून सुमारे ८० जण जखमी झाले. उधमपूर जिल्ह्यातल्या बैन गावातील बेनी संगम इथं बैसाखी उत्सवादरम्यान ही दुर्घटना घडली.
मोठ्या संख्येनं नागरिक या पुलावर आल्यानं हा पुल कोसळल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे. पोलीस आणि इतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं असून बचावकार्य सुरू आहे. (AIR NEWS)