A part of Indiaonline network empowering local businesses

जलजीवन मोहिमेंतर्गत ११ कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी

News

जलजीवन मोहिमेंतर्गत अकरा कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आल्याचं सरकारनं म्हंटलय. जलशक्ती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, ऑगस्ट २०१९ मध्ये जल जीवन मोहिमेच्या घोषणेच्या वेळी, सुमारे तीन कोटी ग्रामीण कुटुंबांकडे नळ कनेक्शन असल्याची माहिती मिळाली होती, आता १४ कोटी २४ लाख ग्रामीण कुटुंबांना त्यांच्या घरात नळाने पाणीपुरवठा होतोय. (AIR NEWS)

20 Days ago