आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

जागतिक भागिदारी मजबूत करण्याचा नरेंद्र मोदी - डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार

News

परस्पर विश्वास, समान हितसंबंध आणि सदीच्छेच्या पायावर भारत आणि अमेरिका यांच्यातली व्यापक जागतिक सामरिक भागिदारी मजबूत करण्याचा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त् केला आहे.

विशेषतः सागरी आणि अवकाशविषयक माहितीची देवाण घेवाण करुन, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याचा मनोदय दोन्ही नेत्यांनी काल संध्याकाळी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात अधोरेखित केला आहे.MH-६०R, आणि AH-६४E अपाचे हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या भारताच्या अलिकडच्या निर्णयाचं ट्रम्प यांनी स्वागत केलं.

नव्या लष्करी क्षमता प्राप्त करण्यासाठी भारत प्रयत्न करत असताना, खरेदी आणि तंत्रज्ञान हस्तांतरासाठी भारताचा सर्वोच्च प्राधान्यानं विचार करायची तयारी दाखवून, ट्रम्प यांनी भारतातल्या ‘प्रमुख शिक्कामोर्तब केलं.

पायाभूत देवाणघेवाण आणि सहकार्य करारासह संरक्षण करारांच्या पूर्तीसाठी आपण उत्सुक असल्याचं उभय नेत्यांनी म्हटलं आहे.

भारत-अमेरिका संबंधातल्या व्यापार आणि गुंतवणूक या अंगाचं वाढतं महत्व लक्षात घेऊन, दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला लाभादायी ठरेल, अशा दीर्घकालीन व्यापार स्थैर्याची गरज उभय नेत्यांनी व्यक्त केली. (AIR NEWS)

33 Days ago

Download Our Free App