A part of Indiaonline network empowering local businesses Chaitra Navratri

जागतिक महिला मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या फेरीत निखत झरीन विजयी

News

नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक महिला मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताच्या निखत झरीननं 50 किलो वजनी गटात अझरबैजानच्या अनाखानिम इस्मायिलोव्हावर दणदणीत विजय मिळवला. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत निखत झरीनची लढत अल्जेरियाच्या रुमायसा बोआलम हिच्याशी होणार आहे. या स्पर्धेत 52 किलो वजनी गटात भारताच्या साक्षी चौधरी हिनं कोलंबियाच्या मारिया जोस हेनाओचा 5 -0 असा पराभव केला.

तिची पुढची लढत झाझिराउर्काबायेवा हिच्याशी होणार आहे. तर 54 किलो वजनी गटात प्रीतीनं हंगेरीच्या हॅनालकोटरला पराभूत केलं. यास्पर्धेत 81 किलोपेक्षा जास्त वजनी गटात भारताच्या नुपूर श्योराण हिनं उत्तम कामगिरीच्या जोरावर गयानाच्या अबिओलाजॅकमॅनचा 5-0 असा पराभव केला. आता उपांत्यपूर्वफेरीत तिची लढत लाज्जत कुंगीबायेवाशी होणार आहे. (AIR NEWS)

9 Days ago