A part of Indiaonline network empowering local businesses Chaitra Navratri

टर्की आणि सिरीयामधील भुकंपात तीन हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू

News

टर्की आणि सिरीया या देशांना काल भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसले. आतापर्यंत यात तीन हजार आठशेहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून, त्यांच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक जण अडकून पडले आहेत, त्यामुळे मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. टर्की आणि सिरीया बरोबरच लेबेनॉन, सायप्रस आणि इस्राइलमध्ये देखील हे धक्के जाणवले. रिखटर स्केल वर या भूकंपांची तीव्रता 7 पूर्णांक 8 दशांश आणि 7 पूर्णांक 6 दशांश इतकी नोंदवली गेली.

या आपत्तीत टर्की सरकारला मदत करण्यासाठी भारतासह अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण बैठकीत, या दुर्घटनेतील बळींना श्रद्धांजली म्हणून एक मिनीटाचं मौन पाळण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत, बळींना श्रद्धांजली वाहिली आहे. (AIR NEWS)

47 Days ago