Best for small must for all

डब्लूडब्लूईची कॉमेंट्री आता हिंदीमध्ये

News

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटच्या (डब्लूडब्लूई) प्रेक्षकांना खेळाचे धावते वर्णन (कॉमेंट्री) यापुढे आपल्याला इंग्रजी ऐवजी हिंदी भाषेत ऐकायला मिळणार आहे.

डब्लूडब्लूई हा स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो. युरोप, अमेरिकेपासून आशिया खंडांमध्ये जवळपास १२२ देशांमध्ये डब्लूडब्लूई पाहिले जाते. भारतातही या खेळाची मोठी क्रेझ आहे. या प्रेक्षकांना खुश करण्यासाठी डब्लूडब्लूईने हिंदीतून कॉमेंट्रीचा निर्णय घेतला आहे.

डब्लूडब्लूईचे प्रसारण (ब्रॉडकास्ट) हक्क सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट या मीडिया कंपनीने विकत घेतले आहेत. सुरुवातीला ‘रॉ’ आणि ‘स्मॅकडाउन’ हे दोन शो त्यांनी प्रायोगिक तत्वावर हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यास सुरुवात केली होती. या प्रयोगाला प्रेक्षकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहून आता डब्लूडब्लूई एनएक्सटी, डब्लूडब्लूई स्पेशल इव्हेंट, डब्लूडब्लूई सुपरस्टार, रेसलमेनिया हे सर्व शो तसेच सर्व मोठ्या स्पर्धांचे समालोचनक हिंदीमध्ये केले जाणार आहेत. डब्लूडब्लूईच्या हिंदी पर्वाची सुरुवात येत्या १५ जूनपासून होणार आहे.

(PRAHAAR)

340 Days ago
Advertise Here