आपकी जीत में ही हमारी जीत है
Promote your Business

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीत संरक्षण, सुरक्षा आणि व्यापार या मुद्यांवर चर्चा

news

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीची देश उत्सुकतेनं वाट पाहत असून, या भेटीमुळे दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची तसंच जागतिक सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्याची संधी मिळणार आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ तारखेला अहमदाबाद भेटीनं भारताचा दोन दिवसीय दौरा सुरु करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात येत्या पंचवीस तारखेला नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होईल.

या चर्चेत संरक्षण, सुरक्षा आणि व्यापारासह सर्व मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल बातमीदारांना सांगितलं. एच-वन-बी व्हिसाशी संबंधित मुद्यांवरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले. (AIR NEWS)

38 Days ago

Download Our Free App