तामिळनाडूत पोंगल हा सण आज मोठ्या उत्साहात सुरु

News

तामिळनाडूत, सुगीच्या काळात साजरा केला जाणारा पोंगल हा सण आज मोठ्या उत्साहात सुरु झाला. तामिळ दिनदर्शिकेनुसार थाई या पवित्र महिन्याचा पहिला दिवस पोंगल म्हणून साजरा होतो. यानिमित्तानं विविध राजकीय नेत्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

दारादारात रांगोळ्यांचे सडे घालुन आणि हळद, आले, ऊस अशा कृषी उत्पादनांची पूजा करुन, पोंगल साजरा होत असतो. या निमित्तानं गोडाधोडाचे पारंपारिक जिन्नस बनवले जातात. (AIR NEWS)

33 Days ago